|
रांची (झारखंड) – ऐन नवरात्रीच्या तोंडावर येथे काली मंदिरासमोर बंदी असलेल्या मांसाची गोणी आढळल्यामुळे परिसरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काली मंदिरासह शहरातील अन्य दोन ठिकाणीही मांसाचे तुकडे विखुरलेले आढळले. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये हे मांस ट्रॅक्टरमधून वाहून नेले जात असल्याचे दिसलेे. ही घटना २९ सप्टेंबरच्या सकाळी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१. रांचीचे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस अधीक्षक सुमित अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, २९ सप्टेंबरला सकाळी ११.१५ वाजता रांचीमधील एच्.बी. रोड, थडपखाना येथे मांसाने भरलेली गोणी आढळली. या वेळी हिंदूंनी लालपूर-अल्बर्ट एक्का चौक रस्ता अडवला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह दुर्गापूजा समिती आणि भाजपचे नेते अन् कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र लोकांचा रोष काही अल्प होण्याची चिन्हे दिसत नव्हती.
२. हा गोंधळ चालू असतांनाच रांचीमध्ये आणखी दोन ठिकाणी मांसाचे तुकडे सापडले. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या ठिकाणांहून मांस हटवले. असे असले, तरी हे मांस येथपर्यंत पोचलेच कसे ?, यामागे कुणाचा हात आहे ? या माध्यमातून शहरात गोमांसाची तस्करी केली जात आहे का ?, असे प्रश्न हिंदूंकडून विचारले जात आहेत.
३. विशेष म्हणजे ‘पोलीस आणि प्रशासन केवळ हिंदूंचा संताप शमवण्यात गुंतले असून वस्तूस्थिती समोर येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे’, अशी भावना स्थानिक हिंदूंमध्ये आहे.
संपादकीय भूमिका
|