मैसुरू (कर्नाटक) : येथील के.आर्.एस्. बॅक वॉटर परिसरात रात्री उशिरापर्यंत पार्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकली. या वेळी काही जणांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांवरच आक्रमण केल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या ५० हून अधिक युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
आयोजकांनी पार्टीसाठी प्रत्येकाला २ सहस्र रुपये शुल्क ठरवले होते. पार्टीत १५० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक विष्णुवर्धन म्हणाले की, पार्टीमध्ये कोणतेही मादक पदार्थ सापडलेले नाहीत. घटनास्थळी मद्य आणि सिगारेट आढळल्या. तेथे असलेल्या सर्वांच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले जातील.
संपादकीय भूमिकापोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्वास कारणीभूत आहे ! |