मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?
मुंबई – मुंबईतून अमली पदार्थांच्या माध्यमातून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे समोर येत आहे. दाऊदचा हस्तक चिंकू पठाण हा त्याच्या इतर अमली पदार्थ तस्करांसोबत मिळून मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा करत असल्याचे अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
(सौजन्य : India Today)
दाऊद इब्राहिम याचा हस्तक आणि माफिया करीम लाला याचा नातेवाईक चिंकू पठाण याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने अटक केली आहे. यानंतर मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये धाड घालण्यात आली होती. यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह २ कोटी रुपयांची रोकड आणि शस्त्रे सापडली आहेत. चिंकू पठाणकडे एक डायरी मिळाली असून यामध्ये मुंबई शहरात अमली पदार्थांची तस्करी करणारे आणि अमली पदार्थांची मागणी करणारे ग्राहक यांची सूची पोलिसांच्या हाती लागलेली आहे. यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटी यांची नावे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
The NCB is on the lookout for four members of Dawood Ibrahim aide Chinku Pathan’s drug cartel.#NCB
(@divyeshas)https://t.co/ftnG0qrdW3— IndiaToday (@IndiaToday) January 22, 2021
आतंकवाद्यांना केला जात होता आर्थिक पुरवठा !
आतापर्यंतच्या पडताळणीनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ मुंबईमध्ये विकले गेले आहेत. हवालामार्गे हा पैसा परदेशात पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये डोंगरी परिसरातील चार ठिकाणी धाडी घालण्यात आल्या असून ४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईत विकले जाणारे अमली पदार्थ आणि आतंकवादाला हवालामार्गे होणारा आर्थिक पुरवठा लक्षात घेता आता यापुढे जाऊन केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालयसुद्धा यामध्ये पडताळणी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.