वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.

आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !

अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

कुडचडे येथे भर बाजारातील दुकाने फोडून चोरी

अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.

गोव्याच्या पर्यटन धोरणाला चर्च संस्थेचा विरोध

राज्याचे पर्यटन धोरण हे गोवा आणि गोमंतकीय यांच्या हितासाठी नाही. हे पर्यटन धोरण स्थगित ठेवावे, अशी मागणी चर्च संस्थेशी निगडित ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम्’ने गोवा शासनाकडे केली आहे.

गोव्यात पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा विद्यालयांना आदेश

पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.

गोव्यातील भाजप सरकारचे मातृभाषाविरोधी धोरण केंद्रशासनाच्या धोरणाविरुद्ध ! – प्रा. सुभाष वेलींगकर, सहनिमंत्रक, भा.भा.सु.मं

केंद्र सरकार मातृभाषा पोषणासाठी जे करते, त्याच्या एकदम उलटे मातृभाषाविरोधी धोरण गोव्यात भाजप पक्ष आणि त्यांच्या सरकारने स्वीकारले आहे. ही अतिशय दुर्दैवी, निर्लज्ज आणि दुटप्पी नीती आहे, असे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलींगकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथील नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या ‘तपोभूमी’ येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असतांना स्त्रियांसाठी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग असतो.

बेंगळुरू येथे ६२ वर्षीय पुजार्‍याकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार

प्रसारमाध्यमांनी हे वृत्त ठळकपणे प्रसारित केले; मात्र जेव्हा मौलवी, पाद्री यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते, तेव्हा हीच प्रसारमाध्यमे ती वृत्ते दडपून स्वतःचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देतात !

तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंमधील आणखी २ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. २ तरंगत्या कॅसिनोंमधील प्रत्येकी १ कर्मचारी २७ नोव्हेंबर या दिवशी कोरोनाबाधित आढळला, तसेच शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्येही २७ नोव्हेंबर या दिवशी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.