पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !
‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.