Mamata Banerjee’s Shocker : (म्हणे) ‘महाकुंभाचे रूपांतर ‘मृत्यूकुंभा’त झाले आहे !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे चेंगराचेंगरीवरून केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारांवर टीका करतांना विधानसभेत विधान !

कोलकाता (बंगाल) – महाकुंभाचे रूपांतर ‘मृत्यूकुंभा’त झाले आहे. मी महाकुंभ आणि गंगामाता यांचा आदर करते; पण सामान्य लोकांसाठी कोणतीही योजना नाही. श्रीमंत आणि मान्यवर यांच्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे तंबू उपलब्ध आहेत; परंतु गरिबांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. जत्रेत चेंगराचेंगरीची परिस्थिती सामान्य आहे; परंतु योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे, अशी टीका बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या विधानसभेत बोलतांना केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यावर केली.

१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आरोप करतांना पुढे म्हटले की, हा पक्ष राजकीय लाभासाठी धर्माचा वापर करत आहे. भाजपचे आमदार द्वेष पसरवतात आणि समाजात फूट पाडतात.

२. बांगलादेशी कट्टरतावाद्यांशी संबंध असल्याच्या भाजपच्या आरोपावर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, जर भाजपने माझे बांगलादेशी कट्टरतावाद्यांशी काही संबंध असल्याचे सिद्ध केले, तर मी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देईन. खोटे आरोप करणार्‍या भाजप आमदारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहे.

संपादकीय भूमिका

  • चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत, हे वास्तव असले, तरी त्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. यासाठी त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !
  • ममता बॅनर्जी यांच्या मनात हिंदूंच्या धार्मिक कृतींच्या संदर्भातच द्वेष भरला असल्याने तोच त्यांच्या ओठावर येत आहे !