Mamta On Prayagraj Mahakumbh : ‘१४४ वर्षांनंतर महाकुंभ होत नाही !’

हिंदुद्रोही ममता बॅनर्जी यांचे संतापजनक विधान

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – महाकुंभ प्रत्येक १२ वर्षांनी आयोजित केला जातो. जे लोक असे म्हणत आहेत की, हे १४४ वर्षांनंतर घडत आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हा वर्ष २०१४ मध्येही झाला होता. १४४ वर्षांनंतर कुंभमेळा आयोजित केला जात आहे, हा दावा खरा नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. या विधानावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांचे विधान लांगूलचालनाच्या राजकारणाने प्रभावित !

भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या निवडक विधानामुळे त्यांचे हिंदूविरोधी राजकीय धोरण पुन्हा उघड झाले आहे. त्यांनी वारंवार दिलेली दिशाभूल करणारी विधाने राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसते. सनातन धर्माच्या पवित्र घटनांना दुर्बल करण्याचा आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो त्यांच्या लांगूलचालनाच्या राजकारणाने देखील प्रभावित आहे.

बॅनर्जी यांच्या या विधानावर भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी जे काही म्हणत आहेत, ते चुकीचे आहे. ६६ कोटी लोकांनी येथे येऊन पवित्र स्नान केले आहे. हे चुकीचे आहे का ? लोकांनी सनातन धर्माची शक्ती पाहिली आहे.

संपादकीय भूमिका

देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको ! हिंदु भाविक श्रद्धेने महाकुंभाच्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून आध्यात्मिक लाभ घेत आहेत, तर ममता बॅनर्जी यांच्यासारखे जन्महिंदु अशा प्रकारची विधाने करून अधोगती करून घेत आहेत !