Islamist Attacks Shitala Mata Mandir : बरुईपूर (बंगाल) : माता शीतलादेवी मंदिरातील मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

आरोपी मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा दावा

कोलकाता (बंगाल) – दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपूर शहरात शेख इंदू नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने माता शीतलादेवीची मूर्ती तोडली. तसेच तिला जाळण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी आरोपी शेख इंदू याला पकडले आणि पोलिसांच्या नियंत्रणात दिले. (जर या घटनेत प्रार्थनास्थळ मशीद असती आणि आरोपी हिंदु, तर त्याचे ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) होऊन त्याचा मृतदेहच पोलिसांच्या नियंत्रणात दिला गेला असता, हेही लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक) बरुईपूर पोलिसांनी दावा केला की, आरोपी शेख इंदू मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो शहराबाहेरील आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणारा मुसलमान नेहमीच मनोरुग्ण असतो, असेच पोलिसांकडून सांगण्यात येते ! मनोरुग्ण मुसलमानाला हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचे कसे कळते ? मशीद किंवा मदरसा या ठिकाणी तो कधी आक्रमण कसे करत नाही ? असे प्रश्‍न उपस्थित होतात. हिंदु मनोरुग्ण कधी मशिदीवर आक्रमण करत नाहीत, हेेही लक्षात घ्यायाला हवे !