टी.सी.एस्. आस्थापनाकडून विनामूल्य संगणक प्रणाली

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ‘ऑनलाईन’ नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी https://online.vitthalrukminimandir.org.in/#/login या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
याविषयीची अधिक माहिती, अटी आणि शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६ – २२८८८८ या दूरभाष क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.