
नवीन देहली – ‘इंडियन एक्सप्रेस’ने भारतातल्या १०० प्रभावी लोकांची सूची घोषित केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्योजक गौतम अडाणी, उद्योजक मुकेश अंबानी, योगऋषि रामदेवबाबा, अमिताभ बच्चन, विराट कोहली आदींची नावे आहेत, तसेच यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही नाव आहे. या सूचीत देशभरात प्रसिद्ध असलेले व्यावसायिक आदी लोकांची नावे आहेत.