मेळावा ठरणार निर्णायक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

पणजी, ३० मार्च (वार्ता.) – मराठीला गोव्यात राजभाषेचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी ३१ मार्च या दिवशी दुपारी ३.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा निर्णायक ठरणार आहे, असे उद्गार भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि मेळावा यांचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काढले आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा राजभाषा कायद्यानुसार कोकणी ही अधिकृत भाषा असून मराठीलाही समान दर्जा देण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात सरकारी पातळीवर तसा दर्जा मराठीला मिळत नाही. ही आजची स्थिती आहे. पणजी येथे होणार्या मेळाव्याला गोव्यातील सर्व मराठीप्रेमी आणि मराठी भाषिक यांनी उपस्थिती लावून मराठी राजभाषेसाठी निर्धार करावा. मराठीला देण्यात आलेला समान दर्जाही अनेकांना खुपत आहे. त्यासाठी निर्धार मेळाव्याला सर्व मराठीप्रेमींनी एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.’’