
संभल (उत्तरप्रदेश) – येथे ३० मार्चच्या ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ मशीद आणि ईदगाह मैदान येथेच नमाजपठण करण्याची अनुमती दिली आहे. घरांचे छत, रस्ते, पदपथ आदींवर नमाजपठण करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संभलमधील संवेदनशील वातावरण लक्षात घेऊन प्रशासनाने ईद आणि चैत्र नवरात्रोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलावली होती. त्यात या आदेशाची माहिती देण्यात आली.
संपादकीय भूमिकासंपूर्ण देशातच रस्त्यावर नमाजपठणाला कधीच अनुमती असू नये. कुणी तसे करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे ! |