Rana Sanga Controversy : महाराणा सांगा यांना ‘गद्दार’ म्हणणार्‍या समाजवादी पक्षाच्या खासदाराच्या घरावर करणी सेनेचे आक्रमण

वाहनांची केली तोडफोड

समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाला सुमन

आगरा (उत्तरप्रदेश) – मेवाडचे राजे महाराणा सांगा यांना राज्यसभेत बोलतांना ‘गद्दार’ म्हणणारे समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाला सुमन यांच्या घरावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. येथे त्यांनी घराबाहेर वाहने आणि खुर्च्या यांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या आक्रमणाच्या वेळी काही पोलीस घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राणा सांगा यांनी बाबराला भारतात आमंत्रित केले, अशी फुकाची टीका सुमन यांनी केली होती. इतिहासतज्ञांच्या मते राणा सांगा यांनी भारतावर त्या वेळी राज्य करणारा इब्राहिम लोधी याच्या विरोधात लढण्यासाठी कधीही बाबरला आमंत्रित केले नव्हते.

संपादकीय भूमिका

अशा खासदारावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्याची खासदारकी रहित केली पाहिजे, तरच इतरांना अशा प्रकारचे विधान करण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची जाणीव होईल !