Moradabad Muslims Attack On Hindus : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मोठ्या आवाजात कीर्तन चालू असल्यावरून मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

अनेक जण घायाळ

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील बहादुरपूर गावात मोठ्या आवाजात कीर्तन चालू असल्यावरून मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी दगडफेक करण्यासह लाठ्यांचाही वापर करण्यात आला. यात अनेक जण घायाळ झाले. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी १६ ज्ञात, तर अनेक अज्ञातांवर गुन्हा नोंदवला आहे. सध्या येणे तणाव आहे. पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

१. गावातील हिंदु महिलांचा आरोप आहे की, त्या कीर्तन करत असतांना काही मुसलमानांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वाद वाढला, तेव्हा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामुळे अनेक जण घायाळ झाले.

२. पोलीस अधीक्षक कुंवर आकाश सिंह म्हणाले की, २४ मार्चच्या संध्याकाळी एक प्राणी मशिदीत घुसल्याने वाद चालू झाला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली, ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. कीर्तनाच्या आवाजामुळे तणाव आणखी वाढला.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून दिसून येते. त्यावरून धर्मांधांमध्ये हिंदुद्वेष किती ठासून भरलेला आहे, हे लक्षात येते !