Prayagraj Bomb Blast Case : प्रयागराज येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी २ मुसलमानांसह तिघांना अटक : १२ बाँब जप्त

मैत्रिणीला भेटण्यास विरोध करणार्‍यांना धमकावण्यासाठी स्फोट घडवल्याचा आरोपींचा दावा

अटक करण्यात आलेले आरोपी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील जुन्या कटरा बाजारात काही दिवसांपूर्वी गावठी बाँबचा स्फोट झाला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या स्फोटांच्या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल्ला, अदनान आणि मनजीत या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ गावठी बाँब जप्त केले. त्यांनी चौकशीत सांगितले की, त्यांनी अदनानच्या मैत्रिणीच्या परिसरातील लोकांना घाबरवण्यासाठी हे सर्व केले होते.

अदनानने सांगितले की, जेव्हा तो जुना कटरा बाजारात त्याच्या मैत्रिणीला भेटायला जायचा, तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला विरोध करायचे आणि त्याला येण्यापासून रोखायचे. त्यामुळे त्याने १९ मार्च या दिवशी दारू पिऊन त्याच्या मित्रांसमवेत तेथे बाँबस्फोट केले.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमानांकडे कोणतेही कारण का असेना, बाँब असतातच आणि ते त्याचा उघडपणे वापर करतात, हे लक्षात घ्या ! असेच बाँब पुढे हिंदूंच्या विरोधात वापरण्यात आले, तर आश्‍चर्य ते काय ?