प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवटाचे अवघ्या २ दिवसांत ६० सहस्र भाविकांनी घेतले दर्शन

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयाग येथील ४५० वर्षांपासून बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला पवित्र ‘अक्षयवट’ सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नुकताच खुला केला.

कुंभक्षेत्री संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बगल

कुंभक्षेत्री झालेल्या एका कार्यक्रमात संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बगल दिली.

कुंभक्षेत्री साधू-संतांना करावा लागत आहे असुविधांचा सामना !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ‘कुंभक्षेत्री शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात आल्या आहेत’, असे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात . . . . .

कुंभमेळ्यात ओडिशातील ‘क्रिया योग आश्रमा’च्या नामजप फेरीचे सनातन संस्थेच्या वतीने स्वागत

ओडिशातील ‘क्रिया योग आश्रमा’च्या नामजप फेरीचे कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या प्रदर्शनस्थळासमोर आगमन झाले. या फेरीत २०० हून अधिक जण सहभागी झाले होते.

कुंभनगरी प्रयागराज येथे हुतात्मा सैनिकांना शतकुंडी महायज्ञाद्वारे देण्यात येणार श्रद्धांजली !

हुतात्मा सैनिकांना शतकुंडी महायज्ञाद्वारे श्रद्धांजली देण्यात येणार आहे. कुंभमेळ्यातील सेक्टर १४ च्या हरिश्‍चंद्र मार्गाच्या ठिकाणी असलेल्या देहराडून येथील ‘अति विष्णु महायज्ञ सेवा समिती’च्या शिबिरामध्ये या महायज्ञाची सिद्धता चालू आहे.

कुंभमेळ्यात १३ जानेवारीपासून प्रत्येक सेक्टरमध्ये भंडारा प्रारंभ होणार !

कुंभमेळा क्षेत्रातील प्रत्येक सेक्टरमध्ये २४ घंटे भंडारा असणार आहे. ‘ॐ नमः शिवाय संस्थाना’ने प्रत्येक सेक्टरमध्ये भंडारा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवट ४५० वर्षांनंतर हिंदु भाविकांसाठी खुला !

गेल्या ४५० वर्षांपासून येथे बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेला अक्षयवट आणि सरस्वती कुप हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भाविकांसाठी खुले करण्याची ऐतिहासिक घटना येथे १० जानेवारीला घडली.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव

सुरक्षेच्या कारणास्तव मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह यांचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महानिरीक्षक……

प्रयागराज येथील कुंभमेळ्याला आध्यात्मिक स्वरूप देण्याचा उत्तरप्रदेश शासनाचा स्तुत्य प्रयत्न !

जागोजागी कुंभमेळा, गंगा, प्रयागराज यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संस्कृतमधील श्‍लोक लावले आहेत; तर बस आणि रेल्वे स्थानक येथून प्रयागराज शहरात प्रवेश केल्यावर बहुतांश भिंती, पूल, यांवर देवता, संत, साधू आणि पौराणिक कथा दर्शवणारी सुंदर चित्रे रेखाटली आहेत.

सनातन पंचांगाच्या माध्यमातून धर्मज्ञान पोहोचवण्याचे प्रशंसनीय कार्य सनातन संस्था करत आहे ! –  प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज

सूर्य, चंद्र, ग्रह आणि नक्षत्र अन् त्यांचा प्राणीमात्रांवर तिथीनुसार होणारा परिणाम आदींचा परिपूर्ण अभ्यास केवळ ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. सनातन संस्था सनातन पंचांगाच्या माध्यमातून ही माहिती, तसेच साधना आणि अन्य धर्मज्ञान ….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now