सिंधुदुर्गनगरी येथे एका पोलिसाच्या घरातून दुसर्‍या पोलिसाच्या मुलानेच केली दागिन्यांची चोरी

पोलीस वसाहतीत रहाणार्‍या ओंकार राजू माळगे याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला.

पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाची (इडीची) धाड !

मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण (‘सर्च ऑपरेशन’) करण्यात येत असल्याचे समजते.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचे पैशाच्या वादावरून अपहरण !

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक

गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजप नेत्याच्या घरावर इडीने धाड टाकली का ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट.., भाजपवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे मग त्यांची चौकशी का नाही ?, असे प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक करा !

पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्‍यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही.

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी

सध्या कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने काळजी हीच त्यावरील लस आहे. प्रशासन वारंवार कोरोनाच्या संदर्भातील आचारसंहितेचे पालन करा, असे सांगत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सिद्ध आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की अन् मारहाण

असे विद्यार्थी देशाचे भवितव्य काय घडवणार ?