पुणे – येथील श्री चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाची घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या श्री चतु:श्रृंगीदेवी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम काही दिवसांपासून चालू आहे.
‘श्री सूक्त’ पठणासाठी आवाहन
ट्रस्टकडून यंदापासून ‘श्री सूक्त’ पठण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी महिला आणि पुरुष यांनी देवस्थानाच्या कार्यालयामध्ये नावे नोंदवावीत. सकाळी १० ते सायंकाळी ७ या समयमर्यादेत येऊ शकता, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.