लोहगाव (पुणे) येथे ‘गायत्री परिवारा’च्या वतीने महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन !

‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके !

मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर

पुणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मात महिलांना देवीचे रूप समजले जाते; पण सद्यस्थितीत महिलांवर अत्याचार होत आहेत. हिंदु मुलींना मुसलमान कलाकार चांगले वाटतात. मुलींना धर्मशिक्षण मिळाले नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या कचाट्यात सापडतात. महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी व्यायामाचे प्रकार करून सिद्ध व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले. लोहगाव येथे गायत्री परिवाराच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात समितीला निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी कु. क्रांती पेटकर यांनी महिलांना ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले.

उपस्थित जिज्ञासू

स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखवून महिलांकडून ते करवून घेण्यात आले. गायत्री परिवाराच्या वतीने समितीच्या कु. क्रांती पेटकर, कु. जान्हवी मोरे, कु. स्नेहल मुळूक, कु. अभिषेक मांढरे, श्री. युवराज पवळे आदींचा सत्कार करण्यात आला. १०० जणांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. गायत्री परिवाराच्या पुणे विभागाच्या प्रतिभा मुळे यांनी त्यांच्या उपक्रमांची माहिती दिली.

गायत्री परिवाराच्या वतीने ‘कार्य जागरण, आवश्यकता आणि उद्देश’ याविषयी ज्योती सिन्हा यांनी अवगत केले. ‘प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळातील महिलांची स्थिती’ याविषयी नेहा यादव यांनी मार्गदर्शन केले. ‘व्यक्तीमत्त्व विकास’ संदर्भात अनिता सेन यांनी जागृती केली.

स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिक सादर करतांना समितीचे कार्यकर्ते

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘विषय मांडल्यानंतर वातावरण क्षात्रतेजाने भारीत झाले आहे आणि विषय सर्वांच्या अंतर्मनापर्यंत पोचला आहे’, असे समितीच्या कार्यकर्त्यांना जाणवले.

२. कार्यक्रम संपल्यावर पुष्कळ महिलांनी स्वागतकक्षावर उभे असलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण पुष्कळ छान झाले. सोसायटीमध्ये कार्यक्रम ठेवण्यासाठी समितीचा संपर्क क्रमांक नोंद करून घेतला. लव्ह जिहादचे ६ ग्रंथ वितरित झाले.