सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – हे २५ वर्षे कायम राहील. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्‍यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. ज्यांचे आदेश हे पाळत आहेत, त्यांच्या १०० लोकांची सूची मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत पैसा कुठून कसा वापरला जातो, कुणाच्या माध्यमातून येतो, बेनामी वगैरे काय आहे, हे ईडीला माहीत नसले, तरी आम्हाला ठाऊक आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. धैर्य असेल, तर घरी या आणि अटक करा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.