काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याकडून तक्रार प्रविष्ट

नागपूर – येथील महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रसिद्धीसाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह असणार्या अशोकचक्रावर उभा झाडू छापण्यात आला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून तक्रार प्रविष्ट केली, तसेच महापालिकेच्या दोषी अधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्याचीही मागणी केली.

या लोगोचे डिझाईन ‘स्वच्छ भारत अभियाना’च्याच अंतर्गत असणार्या लोगोवरून घेतल्याचे स्पष्टीकरण नागपूर महानगरपालिकेने दिले आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या राष्ट्रीय भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाराष्ट्रीय चिन्हाचा अवमान करणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक