मुंबई – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसर्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर आता ‘लाडकी बहीण योजने’च्या पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
२९ सप्टेंबर या दिवशी रायगड येथे तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचा लाभ वितरीत करण्यात येईल. तिसर्या हप्त्यात एकूण २ कोटी महिलांना लाभ दिला जाईल. या योजनेसाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.