बजरंग दलाकडून मडगाव येथील अनधिकृत पशूवधगृहातून २ गुरांना जीवदान !

  • निवासी इमारतीच्या तळघरात होते पशूवधगृह

  • पशूवधगृहात सापडले गुरांच्या चरबीचे २० किलो वजनाचे ४१ डबे

मडगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – खारेबांध, मडगाव येथे एका इमारतीच्या तळमजल्यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी उघड केले आहे. त्या ठिकाणच्या २ बैलांची सुटका करून त्यांना ‘ध्यान फाऊंडेशन’कडे सोपवण्यात आले आहे. मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मडगाव पोलिसांकडून अस्लम बेपारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंद

मडगाव पोलिसांनी २ गोवंशियांची हत्या केल्याच्या प्रकरणी अस्लम बेपारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पशूसंवर्धन कायद्याच्या विविध कलमान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भगवान रेडकर यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अनधिकृतपणे पशूवधगृहे चालवली जात असल्याने आणि गुरांच्या चरबीची विक्री केली जात असल्याचे पोलीस तपासातही उघड झाले आहे. याविषयी अधिक माहिती देतांना बजरंग दलाचे विराज देसाई म्हणाले, ‘‘खारेबांद येथील एका इमारतीच्या तळघरात हत्या करण्यासाठी ४ गुरे आणण्यात आली होती. याविषयी माहिती मिळाल्यानंतर बजरंग दलाच्या सहकार्‍यांसह गुरे नेण्यात आलेल्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला आणि या वेळी गाडीत २ रेडे आणि २ बैल असल्याचे समोर आले; मात्र पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर तेथे केवळ २ बैल आढळले. प्रारंभी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हत्या करण्यासाठी आणलेली गुरे परत देण्याची मागणी करताच तेथील काही धर्मांध लोकांनी दगडफेक आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला अन् उपस्थित धर्मांध महिला अर्वाच्च भाषेत शिव्या देत अंगावर धावून आल्या.’’

पशूवधगृहात आढळले गुरांच्या चरबीचे २० किलो वजनाचे ४१ डबे !

विराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘पशूवधगृहात गुरांच्या मांसातील चरबीचे २० किलो वजनाचे ४१ डबे आढळून आले. एक डबा भरण्यासाठी २ गुरांना मारावे लागते. या ठिकाणी तब्बल ४१ डबे आढळल्याने किमान ८२ गोवंशियांची हत्या करण्यात आली आहे. या चरबीची कुठे विक्री होते ? याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. येथे गुरांचे सुके मांसही डब्यात आढळून आले. ही रहिवासी इमारत ३ मजली असून त्याखाली तळमजल्यावर हे पशूवधगृह आहे. या ठिकाणी मांस लटकावण्यासाठी लोखंडी हूक, करवत, दोर्‍या, हत्यारे, तसेच सागवानी लाकडाचे ८ फूट लांबीचे ४ खांब आढळून आले.

संपादकीय भूमिका 

  • गोवा शासनाने अशा ठिकाणी योगी आदित्यनाथ शासनाप्रमाणे ‘बुलडोझर’ कारवाई करावी !
  • निवासी इमारतीत पशूवधगृह चालवायला देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !