‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

मुंबई – अन्य धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून त्यांचे ‘लव्ह जिहाद’द्वारे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचे षड्यंत्र जिहाद्यांकडून राबवले जात आहे. याविषयी केवळ भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनाच नव्हे, तर केरळमधील अनेक ख्रिस्ती संघटनांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शीख आणि ख्रिस्ती संघटना यांनी आवाज उठवला आहे. जागतिक स्तरावरही इंग्लंड, म्यानमार आदी देशांत मुसलमानेतर समाजाकडून ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज उठवला जात आहे. पाकिस्तानात कशा पद्धतीने हिंदु, तसेच अन्यधर्मीय अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांचा विवाह मुसलमान वयस्कर पुरुषांशी लावला जातो, इस्लामिक स्टेटमध्ये यझिदी युवतींवर कसे अत्याचार करण्यात आले, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

रशियात तर तेथील ‘मुस्लिम उलेमा कौन्सिल’ने मुसलमान पुरुषांवर अन्यधर्मीय तरुणींशी विवाह करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळे उघड असतांना एम्.आय.एम्.चे खासदार असद्ुद्दीन ओवैसी, तसेच काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री ‘लव्ह जिहाद’ कायद्याला विरोध करत आहेत. हीच मंडळी यापूर्वी देशहिताच्या सी.ए.ए., एन्.आर्.सी. यांसारख्या, तसेच तिहेरी तलाकवर बंदी घालून मुसलमान महिलांना आधार देणार्‍या कायद्याच्या विरोधातही रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधातील कायद्याला विरोध करणारी ही मंडळी प्रेमाचा समान आदर करून मुसलमान तरुणींना हिंदु तरुणांशी विवाह करण्याची अनुमती देतील का ? हे घोषित करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

(प्रसिद्धीपत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या पत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. ‘लव्ह जिहाद’वरील कायद्याच्या विरोधात राज्यघटनेतील १४ आणि २१ या कलमांचा दाखला देणारे ओवैसी यांना राज्यघटनेतील समानतेचे मूलभूत तत्त्व मान्य आहे का ? मान्य असेल, तर प्रथम मुसलमानांसाठी असलेले बहुपत्नीत्व, मुस्लिम पर्सनल बोर्ड यांसह अन्य सर्व कायदे आणि सुविधा रहित करून समान नागरी कायद्यासाठी आग्रह धरण्याचे नैतिक धैर्य दाखवावे.

२. तसेच देहलीतील राहुल राजपूत या हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी प्रेम केल्यावर त्याची मुसलमान समूहाकडून निर्दयपणे हत्या का केली गेली ? याचे उत्तर द्यावे. त्या वेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि नेते तोंड का उघडत नाहीत ? बॉलीवूडने चित्रपटांच्या माध्यमांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचे जे काम अनेक दशके केले. तेच आता ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमांतून मंदिरात मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचे चुंबन दृश्य दाखवणार्‍या ‘अ सुटेबल बॉय’सारख्या वेब सिरीज करत आहेत.

३. केरळमधील अनेक ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात फसवून इस्लामिक स्टेटच्या पहिल्या लढाईसाठी सीरियात पाठवल्याचे उघड झाल्यावर केरळातील ‘सायरो मलबार चर्च’सह अनेक ख्रिस्ती संघटनांनी आवाज उठवला होता. केवळ एक मुसलमानाने अन्य धर्मीय तरुणीशी प्रेमविवाह केला म्हणून विरोध नसून एका मोठ्या षड्यंत्राच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर हिंदु तरुणींची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी होत आहे. यासाठी आता केंद्रशासनाने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा, अशी आमची मागणी आहे.