पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

कोल्हापूर – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड आक्रमणात जिल्ह्यातील निगवे खालसा (ता. करवीर) येथील सैनिक हवालदार संग्राम पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. त्याआधी थोड्याच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील ऋषिकेश जोंधळे हे सैनिक हुतात्मा झाले होते. या पार्श्‍वभूमीवर करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उंचगाव हायवे चौकात तीव्र निदर्शने करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. या वेळी ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान संग्राम पाटील अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, पाकिस्तानला कायमचे नेस्तनाबूत करणे, हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, श्री. विनोद खोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री सागर पाटील, संतोष चोगुले, प्रफुल घोरपडे, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, बाळासाहेब नलवडे, बाबुराव पाटील, खेताजी राठोड, अजित चव्हाण, पांडुरंग खोत, शफिक देवळे, राजू राठोड, रमेश मारवाडी, सदाशिव इंगळे आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.