सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी प्राणांचे बलीदान देणारे बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासारख्या वीरांमुळे पावनखिंड हे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र बनले, असे प्रतिपादन अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड येथील ‘नागेश करजगी ऑर्किड स्कूल’मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या चौथ्या दिवशी झालेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते. ‘शिवधैर्य’ या विषयावर बोलतांना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.
या प्रसंगी श्रीलंका ते भारत सलग १० घंटे २५ मिनिटे पोहून सोलापूरच्या कीर्ती भराडिया यांनी केलेल्या विश्वविक्रमाविषयी त्यांचा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.