अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचे पैशाच्या वादावरून अपहरण !

अपहरण प्रकरणी धर्मांधासह तिघांना अटक

पिंपरी (पुणे) – सिकंदर उपाख्य महंमद रफिक इस्माइल नदाफ याच्यासह आणखी तिघांनी मिळून रिक्शाचे पैसे देण्यावरून मनीषकुमार भगत या तरुणाचे अपहरण केले. (धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर ! – संपादक) त्याच्या क्रेडिट कार्डवरून बळजोरीने मद्य खरेदी केली. त्यानंतर त्याच्या भावाकडे २५ सहस्र रुपयांची खंडणी मागितली. २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते २१ नोव्हेंबर दुपारी १२ वाजताच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे याची पुसटशी कल्पनाही शहरातील कोणत्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना नव्हती. २१ नोव्हेंबरला सकाळी मनीषकुमारच्या नातेवाइकांनी शहरातील प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे पोलिसांशी संपर्क साधल्यावर या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर तांत्रिक साहाय्यकाच्या साहाय्याने आरोपींना पकडून मनीषकुमारची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषकुमार यांचा मित्र अनिल गोरे रिक्शा चालवतो. अनिल आणि आरोपी यांचे रिक्शाच्या पैशांवरून वाद चालू आहेत. त्यातून आरोपी मनीषकुमार याच्या खोलीवर आले असतांना त्यांनी अनिलविषयी चौकशी केली. त्यानंतर वरील प्रकार घडला आहे. मनीषकुमारने याविषयी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक )