बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार !

आरोपी अक्षय शिंदे

बदलापूर – बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ‘ट्रान्झिट रिमांड’साठी नेत असतांना त्याचे ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आले.

अक्षयने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.