
मुंबई – गेल्या सहा वर्षांत एकातरी भाजप नेत्याच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (इडीने) धाड टाकली का ? विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळत आहे. गेल्या ६ वर्षांत भाजप नेत्यांना नोटिसा का नाही ? आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्ट.., भाजपवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे मग त्यांची चौकशी का नाही ?, असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
सुशांत प्रकरणात इडी कशी आली ? त्याचा पैसा चोरीचा, ‘मनी लॉन्ड्रिंग’चा होता का ? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करून भाजपमध्ये घेतले, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !