
खांडवा (मध्यप्रदेश) – हिंदु धर्माच्या भव्यतेने प्रभावित होऊन अन्वर शेख याने इस्लामचा त्याग करून सनातन धर्म स्वीकारला. मध्यप्रदेशातील खांडवा येथील रहिवासी असलेले अन्वर शेख आता राधेश्याम झाले आहेत. या वेळी अन्वर शेख यांचे मुंडण करण्यात आले आणि त्यांना गंगाजलने स्नान घालण्यात आले. यानंतर त्यांचा संपूर्ण विधींसह सनातन धर्मात समावेश करण्यात आला आणि त्यांचे नाव राधेश्याम ठेवण्यात आले. या वेळी लोकांनी राधेश्याम यांचे अभिनंदन केले.
Khandwa, Madhya Pradesh: Impressed by the greatness of Hindu Dharma, Anwar Sheikh renounces Islam becomes Radheshyam
Will those who abandon Hinduism for worldly temptations ever realise its true value?#GharWapsi pic.twitter.com/A8tFhsbvZA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर राधेश्याम म्हणाले की, हिंदु धर्मात भव्यता आणि परंपरा आहेत. सर्वांना समान दृष्टीने पाहिले जाते. सनातन धर्मात धार्मिक स्थळे आणि विधी सर्वांसाठी समान आहेत. माझ्या मनावर लहानपणापासूनच सनातन धर्मातील परंपरांचा प्रभाव होता. हिंदु धर्मात महिलांना देवी म्हणून पुजले जाते. या धर्माइतका महिलांचा आदर करणारा दुसरा कोणताही धर्म नाही. पृथ्वी आणि नद्या यांनाही आईचा दर्जा दिला जातो.
राधेश्याम यांनी लक्ष्मी नावाच्या हिंदु मुलीशी लग्न केले होते. पत्नीच्या हिंदु धर्मावरील श्रद्धेमुळे अन्वर शेख राधेश्याम बनण्याकडे आकर्षित झाला.
संपादकीय भूमिकाविविध आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करणार्यांना आता तरी हिंदु धर्माचे महत्त्व कळेल का ? |