जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या देवतेचा अवमान करणार्‍या मुसलमानाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक

जबलपूर (मध्यप्रदेश) – अब्दुल हाफीज याने येथील हिंदूंच्या पूजनीय असणार्‍या माता बुधी खेरमाई देवीच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी केल्याने येथे तणाव निर्माण झाला. संतप्त हिंदूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अब्दुल मजीद याने व्हॉट्सॲप गटामध्ये अश्लील आणि अपमानास्पद टिपण्या केल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल मजीद याला अटक केली आहे. पोलिसांनी अब्दुल मजीद याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठवले. अब्दुल मजीद याच्यावर यापूर्वीही धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद आहे. (जर पूर्वीच्या गुन्ह्यातच अशा धर्मांधाला कठोर शिक्षा झाली असती, तर पुन्हा त्याला असे करतात आले नसते ! आतातरी त्याला जामीन न देता कठोर शिक्षा होईल का ? हाच प्रश्न आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशांना आता पाकिस्तानप्रमाणे फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने याकडे आता गांभीर्याने पहायला हवे !