इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली आहे. सैन्याच्याच नाही, तर पाकव्याप्त काश्मीरमधील आरोग्य कर्मचार्यांच्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत. तसेच बदल्याही रहित केल्या आहेत.
झेलम खोर्यातील आरोग्य महासंचालकांनी हा आदेश दिला आहे. या भागातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य पथके यांनी कर्मचार्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. सरकारी वाहनांच्या खासगी वापरावरही बंदी आणण्यात आली आहे.