Navy Tests Anti-Ship Missiles : नौदलाने अरबी समुद्रात केली नौकाविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी

नवी देहली – भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौकांवरून अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. नौदलाने सांगितले की, ते रात्रंदिवस देशाचे रक्षण करण्यास सज्ज आहेत. समुद्रात कुठेही धोका असला, तरी आपण त्याचा सामना सहजपणे करू शकतो.

पाककडून सलग तिसर्‍या दिवशी नियंत्रण रेषवर गोळीबार


पाकिस्तानने सलग तिसर्‍या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. हा गोळीबार तूतमारी गली आणि रामपूर सेक्टर येथे करण्यात आला. याला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. यात जीवित किंवा मालमत्ता यांची हानी झाल्याचे वृत्त नाही. दुसरीकडे भारत सरकारने पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या सामाजिक माध्यमांच्या पानांवर बंदी घातली आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या २ जणांना अटक

काश्मीरमधील बडगाममध्ये सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत २ जणांना अटक करण्यात आली आहे. ताहिर अहमद कुमार आणि शबीर अहमद गनई, अशी त्यांची नावे आहेत. अन्वेषणात असे दिसून आले की, दोघांनीही आतंकवाद्यांना साहाय्य केले होते, तसेच ते स्थानिक तरुणांना आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते.