MP Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याने संतप्त जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ

सागर (मध्यप्रदेश) येथील घटना

सागर (मध्यप्रदेश) – सागर जिल्ह्यातील सनोधा गावात मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला पळवून नेल्याने येथे हिंसाचार झाला. संतप्त जमावाने दुकानांची तोडफोड करत जाळपोळ केली. या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या गावात तणावपूर्ण स्थिती असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे लग्न एका तरुणाशी निश्चित झाले होते. त्याआधी या मुसलमान तरुणाने तरुणीला पळवून नेले.

१. स्थानिक आमदार प्रदीप लारिया यांनी सांगितले की, हा मुसलमान तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

२. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा म्हणाले की, लव्ह जिहादमध्ये सहभागी असलेल्या आणि ओळख लपवून हिंदु मुलींची दिशाभूल करणार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा त्याचे काम करेल. भाजपचे सरकार आहे. नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांनाही अशा घटना घडतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !