वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यानंतरचे पहिले प्रकरण

भोपाळ (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात बांधण्यात आलेला बेकायदेशीर मदरसा पाडण्यात आला. वक्फ सुधारणा कायदा कार्यान्वित झाल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्याकडे एका स्थानिक मुसलमानाने या बेकायदेशीर मदरशाच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने मदरसा चालवणार्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर मदरसाच्या संचालकाने स्वतःहून हा मदरसा पाडला.
१. पन्ना येथील बी.डी. संकुलामध्ये ३० वर्षांपूर्वी कुठलीही अनुमती न घेता या मदरसा बांधण्यात आला होता. लोकांनी अनेक वेळा सूचना करूनही मदरसा संचालकाने हा मदरसा बंद केला नाही.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी और गृहमंत्री श्री @AmitShah जी के नेतृत्व में वक्फ पर कानून बनाया गया है और अब इसकी संपत्ति से होने वाली आय का उपयोग अल्पसंख्यक समुदाय के मुस्लिम भाईयों और बहनों के विकास के लिए किया जाएगा। pic.twitter.com/88mXVRQ9av
— VD Sharma (@vdsharmabjp) April 10, 2025
२. वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची चेतावणी प्रशासनाने दिली होती. त्या भीतीने मदरसा संचालकाने बुलडोझरचा वापर करून हा मदरसा पाडला.
३. स्थानिक लोकांच्या मते हा मदरसा सरकारी भूमीवर बांधण्यात आला होता. याच्या आजूबाजूला रहाणारे लोक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी बर्याच काळापासून यावर आक्षेप घेतला होता; मात्र तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. (मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच जनतेला वाटते ! – संपादक)
४. मदरसा संचालकाचे म्हणणे आहे की, हा मदरसा बांधण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडून अनुमती घेतली होती; पण आता हा परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे बांधकाम बेकायदेशीर मानले जात होते. (धर्मांध मुसलमानांच्या या स्पष्टीकरणावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक)
संपादकीय भूमिका३० वर्षांपासून सरकारी भूमीवर बेकायदेशीर मदरसा चालू असतांना प्रशासन झोपले होते का ? |