विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी
सतना (मध्यप्रदेश) – येथील कॉन्व्हेंट शाळेच्या वसतीगृहात शिकणार्या एका अल्पवयीन हिंदु मुलीचा मृतदेह आढळला आहे. प्रतिमा भागवार असे तिचे नाव असून ती आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील शांतीपूर क्रमांक २ येथील रहिवासी होती. १३ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता तिने वसतीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा पाद्री नोव्ही जॉर्ज यांना या प्रकरणाविषयी विचारले, तेव्हा त्यांनी प्रथम स्वतःची ओळख मृत व्यक्तीचे शेजारी म्हणून करून दिली आणि नंतर चर्चचे पाद्री म्हणून दिली. त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.