
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था असतांनाच आतंकवाद्यांनी कुपवाडाच्या कांडी खास भागात गुलाम रसूल मगरे (वय ४५ वर्षे) यांची त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. मगर हे सामाजिक कार्यकर्ते होते.
संपादकीय भूमिकापहलगाम येथील आक्रमणानंतर सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आल्यानंतरही आतंकवादी नागरिकांना ठार मारत आहेत, हे लज्जास्पद आहे ! यातून आतंकवादी सुरक्षादलांना आव्हान देत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे ! |