Pakistan Army Chief Asim Munir : मुसलमानांची विचारसरणी हिंदूंपेक्षा वेगळी !

पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांचा पुनरूच्चार

पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुसलमान आणि हिंदु ही दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा केले आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील काकुल भागातील पाकिस्तान मिलिटरी अकादमी येथे अधिकार्‍यांच्या नियुक्तीच्या कार्यक्रमात मुनीर बोलत होते. यापूर्वी त्यांनी परदेशी पाकिस्तानींच्या एका कार्यक्रमात अशाच प्रकारचे विधान केले होते.

मनीर पुढे म्हणाले की, जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये धर्म, चालीरीती, परंपरा आहेत, तसेच विचारसरणीमध्ये ‘मुसलमान हिंदूंपेक्षा वेगळे आहेत.’ आपल्या पूर्वजांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी फार त्याग केला आहे. त्याचे संरक्षण कसे करायचे ?, हे आपल्याला ठाऊक आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील बहुतेक मुसलमानांची विचारसरणीही हीच आहे. भारताची फाळणी करतांना याच विचारांतून ती करण्यात आली होती आणि ही मागणी करणारे नंतर पाकिस्तानमध्ये जाण्याऐवजी भारतातच राहिले. आज ते भारताची पुन्हा फाळणी करण्यासाठी किंवा भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातून हिंदूंवर आक्रमणे करणे, मंदिरांची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी सर्व प्रकारचे जिहाद या घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !