जम्मू-काश्मीर : २०० हून अधिक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे दिनांक घोषित करण्यात आले आहेत. त्याआधीच पोलीस आणि सामान्य प्रशासन विभागातील २०० हून अधिक अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले.

Raghunath Temple Court Order : श्रीनगरमधील श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेचे व्यवस्थापन उपायुक्तांनी पहावे ! –  जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती एम्.ए. चौधरी यांच्या खंडपिठासमोर श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.

Farooq Abdullah : (म्‍हणे) ‘भारतीय सैन्‍यदल आणि आतंकवादी यांच्‍यामध्‍ये संगनमत !’ – काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुल्ला

भारतीय सैन्‍यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्‍यांचे मानसिक खच्‍चीकरण करणार्‍या अशा राजकारण्‍यांच्‍या विरोधात राष्‍ट्रदोहाचा खटला चालवून त्‍यांना कारागृहात डांबण्‍याची मागणी राष्‍ट्रप्रेमींनी केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

J&K : काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ६ सरकारी कर्मचारी बडतर्फ

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा विचार करत आहे ! – Former D.G. of Police of J&K, S.P. Vaid

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?

Kupwara Encounter : काश्‍मीरमधील कुपवाडामध्‍ये आतंकवादी आक्रमणात एका सैनिकाला वीरमरण : मेजरसह ४ सैनिक घायाळ !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवादी आक्रमणात भारतीय सैन्‍यदलाचे सैनिक वीरगतीला प्राप्‍त होत आहेत. तरी येथील आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्‍या पाकिस्‍तानवर कारवाई करण्‍यास भारत विलंब करत आहे, असेच सर्वसामान्‍य भारतियांना वाटते !

Jammu Kashmir Encounter : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये २४ घंट्यांत २ सैनिकांना वीरमरण

काश्‍मीरमध्‍ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्‍यासाठी पाकला नष्‍ट करण्‍याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?

Terminates J&K Govt Employees : जिहादी आतंकवाद्यांना साहाय्‍य करणारे जम्‍मू-काश्‍मीरचे ४ मुसलमान सरकारी कर्मचारी बडतर्फ !

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवून त्‍यांना कारागृहात टाकून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Kashmir Terrorist Attack : राजौरीमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ सैनिक घायाळ

येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती.

Sarsanghchalak Mohanji Bhagwat : कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले.