अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथे २८ ऑक्टोबरला नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या जिहादी आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीच्या वेळी सैन्यात तैनात असणारा ४ वर्षांचा ‘फँटम’ नावाचा बेल्जियन शेफर्ड जातीचा श्वान वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत फँटमला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याच्या ‘व्हाईट नाइट कॉर्प्स’ या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. यात म्हटले की, आम्ही आमच्या नायकाच्या सर्वोच्च त्यागाला नमस्कार करतो. फँटम आमच्या श्वानपथकामधील एक शूरवीर होता. त्याची निष्ठा कधीही विसरता येणार नाही.
Update
We salute the supreme sacrifice of our true hero—a valiant #IndianArmy Dog, #Phantom.
As our troops were closing in on the trapped terrorists, #Phantom drew enemy fire, sustaining fatal injuries. His courage, loyalty, and dedication will never be forgotten.
In the… pic.twitter.com/XhTQtFQFJg
— White Knight Corps (@Whiteknight_IA) October 28, 2024
मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.
Indian army dog Phantom dies while fighting with terrorists in Akhnoor (Jammu-Kashmir)
In September 2023, a female Labrador dog Kent died in an encounter in Rajouri
Read: https://t.co/CRPEdIPRFw pic.twitter.com/0Mf5qeA91W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2024
लपून बसलेल्या आतंकवाद्यांचा माग काढण्यासाठी भारतीय सैन्याकडून श्वानांचा वापर केला जातो. श्वानांना विविध गॅझेट (उपकरणे) लावलेली असतात, त्यांवरून आतंकवाद्यांचे ठिकाण आणि अंतर तपासले जाते.