सुरेंद्र चौधरी उपमुख्यमंत्री
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. ते या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री बनले. उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. तसेच अन्य ४ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात अपक्ष आमदार सतीश शर्मा यांचा समावेश आहे. त्यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी युती करून विधानसभेची निवडणूक लढवली होती; मात्र काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे या सरकारमध्ये त्यांचा कोणताही मंत्री नाही.