जम्मू (जम्मू-काश्मीर) : जिहादी आतंकवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात २४ ऑक्टोबरच्या सकाळी उत्तरप्रदेशाच्या एका कामगारावर गोळीबार केला. यात प्रीतम सिंह नावाचा कामगार घायाळ झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
🚨A fresh terrorist attack in Pulwama (Jammu-Kashmir) injures one worker
👉 The never ending efforts of J!h@d!$ to destabilize #JammuKashmir will only be brought to an end, by wiping out the very source of J!h@d! terrorism, #Pakistan, and the like minded ones sitting here… pic.twitter.com/0rhKDdZSr7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2024
त्राल भागातील बटागुंड गावात आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले. याआधी २० ऑक्टोबरला आतंकवाद्यांनी गंदरबलमधील श्रीनगर-लेह महामार्गावर सोनमर्गजवळील गगनगीर भागात ‘झेड मोड’ बोगदा बांधणार्या स्थलांतरित कामगारांवर आक्रमण केले होते. त्यात १ डॉक्टर आणि ६ मजूर ठार झाले होते.
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी जिहाद्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असून हे रोखण्यासाठी जिहाद्यांची निर्मिती करणार्या पाकिस्तानचा नायनाट करण्यासमवेत त्यांच्या विचारसरणीला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे ! |