श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये ‘तेहरीक-ई-लब्बैक मुस्लिम’ (टी.एल्.एम्.) ही नवी आतंकवादी संघटना कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘काऊंटर इंटेलिजन्स विंग’ आणि पोलीस यांनी श्रीनगर, गांदरबल, बांदीपोरा, कुलगाम, अनंतनाग आणि पुलवामा येथे अनेक ठिकाणी धाडी घातल्या. पोलिसांनी सांगितले की, ‘टी.एल्.एम्.’ ही प्रतिबंधित आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा एक गट आहे. या गटामध्ये आतंकवाद्यांची भरती केली होती, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या बाबा हमास याच्या सांगण्यानुसार ही भरती केली जात होती.
‘रेझिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारले गांदरबल आक्रमणाचे दायित्व !
पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या अन्य एका आतंकवादी संघटनेने गांदरबल आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. शेख सज्जाद गुल, हा ‘रेझिस्टन्स फ्रंट’चा मुख्य आहे. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्यात ‘रेझिस्टन्स फ्रंट’चा हात होता. या संघटनेने सरकार आणि पोलीस विभाग येथे काम करणार्या स्थानिक मुसलमानांनाही लक्ष्य केले आहे.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत आतंकवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा नवनवीन आतंकवादी संघटना निर्माण होत रहातील, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे अणि आता पाकिस्तानलाच संपवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे ! |