Assam STF Arrests 8 JIHADIS : रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना मारण्याचा कट उघड !

  • आसाम पोलिसांनी देशातून अटक केले ८ जिहादी आतंकवादी !

  • २ बांगलादेशी आतंकवाद्यांचा समावेश

बंगाल आणि केरळ पोलिसांच्या मदतीने आसाम एसटीएफने अटक केलेले आठ दहशतवादी, यातील दोघे बांगलादेशी घुसखोर आहेत !

गौहत्ती (आसाम) : आसाम विशेष कृती दलाने बंगाल पोलीस आणि केरळ पोलीस यांच्याह ‘ऑपरेशन प्रगत’ राबवून ८ आतंकवाद्यांना अटक केली. ते हिंदु नेत्यांना ठार मारण्याचा कट रचत होते. महंमद साब शेख, मीनारुल शेख, अब्बास अली, नूर इस्लाम मंडल, अब्दुल करीम मंडल, मोजीबर रहमान, हमीदुल इस्लाम आणि इनामूल हक अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. हे सर्व लोक देशभरात स्थानिक साहाय्यक गट निर्माण करण्याच्या कामात गुंतले होते. यांतील साब शेख आणि अब्बास अली हे बांगलादेशी आहेत. अब्बासला यापूर्वी बनावट पारपत्र प्रकरणात अटक करण्यात आली होती.

१. आसाम पोलिसांचे विशेष पोलीस महापंचालक हरमीत सिंह म्हणाले की, इस्लामी कट्टरतावादी बंगालमधील मुर्शिदाबाद आणि फलाकाटा येथे एकमेकांना भेटले होते.

२. या बैठकांमध्ये देशातील रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटनांच्या नेत्यांना ठार करून धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कट होता; मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी देशाच्या विविध भागात पथके पाठवून धाडी घातल्या आणि त्यांना अटक केली. त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि वस्तू सापडल्या.

३. केरळ आणि बंगाल येथे रहाणारे हे आतंकवादी महंमद फरहान इसराक याच्यासाठी काम करत होते. इसराक याचे अल् कायदाच्या आतंकवाद्यांशी संबंध आहेत. तसेच तो ‘अन्सारुल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख जसीमुद्दिमन याच्याही जवळचा आहे.

संपादकीय भूमिका

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित आहेत. एकाही मुसलमान नेत्याला ठार मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी कधी कुणाला अटक झाली आहे का ?