Assam B’desh Related Terrorist Arrested : आसाममधून पसार जिहादी आतंकवादी झहीर अली याला अटक

‘अन्सारुल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित

झहीर अली नावाचा पसार आतंकवादी अटकेत !

धुबरी (आसाम) – आसाम पोलिसांच्या विशेष कृती दलाने येथून झहीर अली नावाच्या पसार आतंकवाद्याला अटक केली. आतंकवादी संघटनांविरुद्ध चालवल्या जाणार्‍या कारवाईतून आसाम पोलिसांनी झहीर याला अटक केली. धुबरी जिल्ह्यातील  खुटीगाव गावचा तो रहिवासी आहे. झहीर ‘अन्सारुल्ला बांगला टीम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. ही संघटना अल्-कायदाची सहकारी संघटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झहीर अली अन्सारुल्ला बांगला टीमचा प्रमुख जसीमुद्दीन रहमानी याचा जवळचा सहकारी महंमद फरहान इसराक याच्या टोळीमध्ये काम करत होता.

आसाम पोलिसांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजीव सैकिया म्हणाले की, आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईत आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात अनेक बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. या २१ पैकी बांगलादेशी महंमद साद रादी याला भारतात कट्टरतावादी विचारसरणी पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते. या कारवाई अंतर्गत विशेष कृती दलाने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके, गुन्हेगारी कागदपत्रे आणि भ्रमणभाष संच जप्त केले आहेत.

संपादकीय भूमिका 

अशा आतंकवाद्यांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !