Assam Beef Ban : आसामममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आसाम मंत्रीमंडळाने राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गोमांस बंदीच्या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियूष हजारिका म्हणाले, ‘मी आसाममधील काँग्रेसला आव्हान देतो की, एकतर गोमांस बंदीचे स्वागत करावे किंवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे.’ (गोमांसवर बंदी घालण्याचा निर्णय घेणार्‍या आसाम मंत्रीमंडळाचे अभिनंदन ! – संपादक)

१. आसाममधील काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसेन यांनी भाजपवर नागाव जिल्ह्यातील समगुरी विधानसभा मतदारसंघात मुसलमान मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘गोमांस पार्टी’ आयोजित केल्याचा दावा केला होता.

२. मुख्यमंत्री सरमा यांनी हुसेन यांच्या वक्तव्यावरून प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, पुढील विधानसभेच्या अधिवेशनात गोमांसवर पूर्णपणे बंदी घालणार. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती या सर्वांनी गोमांस खाणे बंद केले पाहिजे. त्यामुळे सर्व समस्या सुटतील.

संपादकीय भूमिका

आसाममधील भाजप सरकारचा स्तुत्य निर्णय !