आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय
गोहत्ती (आसाम) – आसाममधील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचा विरोध केला जात आहे. येथील बराक खोर्यातील कचर, श्रीभूमी आणि हैलाकांडी या जिल्ह्यांमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांमध्ये बांगलादेशी ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. ‘जोपर्यंत हिंदूंवरील आक्रमणे थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही बांगलादेशींना साहाय्य केले जाणार नाही’, असे व्यापार्यांनी म्हटले आहे. यापूर्वी श्रीभूमी जिल्ह्यातील आयात-निर्यात असोसिएशनने बांगलादेशासमवेतचे सर्व व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
१. ‘बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन’चे अध्यक्ष बाबुल राय म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक यांची परिस्थिती चिंताजनक आहे. हे आम्ही स्वीकारू शकत नाही. तेथील परिस्थिती सुधारली, तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो.
२. यापूर्वी त्रिपुरामध्ये ‘ऑल त्रिपुरा हॉटेल आणि रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन’ने बांगलादेशी लोकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यास नकार दिला होता. तसेच बांगलादेशातील कोणत्याही रुग्णावर उपचार करणार नसल्याची घोषणा यापूर्वी येथील खासगी रुग्णालयाने केली होती.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ अशी कृती करणार्या आसाममधील हॉटेल मालकांचा हा अभिनंदनीय निर्णय आहे. भारतात बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात अल्प प्रमाणात हिंदू कृतीशील होत आहेत. हिंदूंवरील आक्रमणांची स्थिती पहाता आतापर्यंत देशातील १०० कोटी हिंदूंनी हिंदूंच्या रक्षणासाठी संघटितपणे भारत आणि बांगलादेश सरकार यांच्यावर दबाव निर्माण करणे अपेक्षित होते ! |