Bangladeshi Soldiers Oppose Temple Renovation : आसामच्या सीमेवर चालू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रोखले !

  • बांगलादेशी सैनिकांचेही आता हिंदुद्वेष कृत्य !

  • भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हुसकावले !

माता मनसादेवी मंदिर

गौहत्ती (आसाम) – बांगलादेशाच्या सिल्हेट विभागाच्या झाकीगंज चौकीवर  तैनात बांगलादेश बॉर्डर गार्डचे सैनिक कुशियारा नदी ओलांडून आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात घुसले. येथे नदीकिनार्‍याच्या फॉरेस्ट रोडवर चालू असलेले माता मनसादेवीच्या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार काम करणार्‍या कामगारांना धमकावून थांबवले. याची माहिती भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन त्यांना विरोध केला. तरीही बॉर्डर गार्डच्या सैनिकांनी विरोध चालू ठेवल्यावर त्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर सैनिक तेथून निघून गेले. या नदीच्या दुतर्फा १५० मीटरचा भाग निर्मनुष्य आहे. येथे कोणत्याही बांधकामासाठी अनुमती घ्यावी लागते.

सध्या सीमा सुरक्षा दलाच्या सुरक्षेत मंदिराचे काम चालू आहे. श्रीभूमी जिल्ह्याची ९४ कि.मी. सीमा बांगलादेशाला जोडलेली आहे. यात ४३ कि.मी. नदीकिनारा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेच्या ४ कि.मी. क्षेत्रात कुंपण बांधलेले नाही.

संपादकीय भूमिका

यातून हे स्पष्ट आहे की, भारत आणि बांगलादेश यांच्यात आता पाकिस्तानप्रमाणेच शत्रुत्व प्रारंभ झाले असून पुढे अशा घटनांत वाढ होऊन सीमेवर बांगलादेशी सैनिकांकडून गोळीबाराच्याही घटना घडू लागतील, यात आश्‍चर्य वाटू नये ! असे होण्यापूर्वीच भारताने बांगलादेशाला योग्य धडा शिकवणे आवश्यक झाले आहे !