ठाणे – दिवाळीनिमित्त येथील वीरा आराधना भवन येथे जैन समाजाच्या युवतींसाठी आयोजित केलेल्या धर्मशिक्षा केंद्रात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ दिवसांचे युवती शौर्य जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा लाभ १५ ते ३५ वर्षे वयोगटातील युवतींनी घेतला. शिबिरात महिलांची सद्य:स्थिती, लव्ह जिहाद, धर्मशिक्षण आणि महिलांची सुरक्षितता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल पाळेकर यांनी युवतींना संबोधित केले. या वेळी युवतींना कराटेचे प्रकार आणि बचावाचे तंत्र शिकवण्यात आले. आयोजकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
अभिप्राय
कु. रश्मी दिव्या – शिबिरामुळे आत्मविश्वास निर्माण झाला. या प्रशिक्षणाचा आम्हाला पुढील आयुष्यात लाभ होईल. या प्रशिक्षणामुळे मनातील भीती गेली असून आम्ही स्वत: संरक्षण करू शकतो. |