
नवी देहली – इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. असे असतांना भारताने ३ युद्धानौका इराणच्या अब्बास बंदरात पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका अब्बास बंदरात दाखल झाल्या आहेत. इराणच्या सैन्यासोबत या युद्धनौका खाडीत युद्धसराव करणार आहेत, असे भारतीय नौदलाच्या अधिकार्याने सांगितले.
सौजन्य:Jagaran
इराणने भारतीय युद्धनौकांचे अब्बास बंदरावर स्वागत केले. भारत आणि इराण यांचे लक्ष समुद्री सहयोगावर असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मार्चमध्ये इराणच्या २ प्रशिक्षण नौका मुंबईत आल्या होत्या. तसेच फेब्रुवारीमध्ये इराणी नौदलाची युद्धनौका भारताच्या नौदल सरावात सहभागी झाली होती.
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन